आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खगोलीय घटना: ‘नेपच्यून’ आज येणार पृथ्वीच्या काहीसा जवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नेपच्यून 26 ऑगस्टला रात्री पृथ्वीपासून अगदी कमी अंतरावर येणार असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्रज्ञ रवींद्र खराबे यांनी सांगितले.


नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा व शेवटचा ग्रह असून सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर 4 अब्ज 49 कोटी 82 लक्ष 52 हजार 900 किलोमीटर असते. मात्र, ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने हे अंतर कधीच सारखे राहत नाही. नेपच्यून सूर्यापासून किमान 4 अब्ज 45 कोटी, तर कमाल 4 अब्ज 55 कोटी किमी अंतरावर असतो. सूर्यपासून पृथ्वी या अंतराच्या 30 पटीने नेपच्यून सूर्यापासून दूर आहे. पृथ्वीपासून नेपच्यूनचे कमीत कमी अंतर साधारणत: 4 अब्ज 29 कोटी 80 लक्ष किलोमीटर असते. त्याची तेजस्विता 7.82 असल्याने तो निळ्या रंगाच्या बिंदूच्या स्वरूपात दिसतो.


शुभ-अशुभ परिणाम नाही
अवकाशातील घटनेचे शुभ-अशुभ परिणाम सांगितले जातात. मात्र, एखादा ग्रह किमान अंतरावर असल्याने राशीपरत्वे शुभ-अशुभ परिणाम होत नाही. प्रभावी दुर्बीण असेल, त्यांनी 26 ऑगस्टला या ग्रहाचे अवलोकन करावे, असे आवाहन खराबे यांनी केले.