आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी, नवनीत राणा, भावना गवळींसह दिग्गजांनी केले मतदान, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. राज्यात विदर्भातील सर्व 10 जागांवर आज मतदान होत आहे. विदर्भात 10 जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात आहेत. यात 183 पुरुष व 18 महिलांचा समावेश आहे. 10 लोकसभा मतदारसंघात एकून 1 कोटी 64 लाख 47 हजार 131 मतदार आपला हक्क बजावतील. यात 78 लाख 48 हजार महिलांचा समावेश आहे. विदर्भात आज होत असलेले मतदान 19 हजार 893 केंद्रांवर मतदान होईल. यात 673 मतदान केंद्र संवेदनशील तर, 243 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. असे असले तरी विदर्भातील नागरिकांनी सकाळपासून मतदान करण्यासाठी रांगा लावून मतदान केले. दुपारी 1 पर्यंत विदर्भात सरासरी 30 टक्के मतदान झाले होते. तर, नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीत सर्वाधिक 44 टक्के मतदान झाले होते. विदर्भातील दिग्गज नेत्यांनी आज मतदान करून आपला हक्क बजावला. तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
(छायाचित्र- अमरावती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी बडनेरा येथे आपल्या गावात मतदान केले.)
पुढे पाहा छायाचित्रांच्या माध्यमातून कोणत्या-कोणत्या दिग्गजांनी केले मतदान...