आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक पोलिसांची पाऊले चालती महाविद्यालयांची वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यंगिस्तानवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अल्पवयीनांना वाहन देऊ नये, यासाठी 24 शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेऊन पत्रे देण्यात आली आहेत.

पोलिस रस्त्यावर उतरून अल्पवयीन वाहनचालक किंवा वाहनपरवाना नसलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करतात. मात्र, त्यामुळे विशेष फरक पडलेला नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विनापरवाना वाहन चालवण्यास मज्जाव करावा किंवा त्यांना समज द्यावी, अशी सूचना केली आहे. सोबतच पालकांना शाळेत बोलावून अल्पवयीन पाल्यास वाहन देऊ नये, अशा सूनचा देण्याची विनंती पत्रातून करण्यात आली आहे. बहुतांश शाळकरी किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे परवाना नसल्याची बाब वाहतूक शाखेच्या तपासणी मोहिमेदरम्यान पुढे आली आहे. शिक्षण विभाग आणि विद्यापीठालासुद्धा या आशयाचे पत्र देण्यात आल्याची माहिती पश्चिम वाहतूक शाखेने दिली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, आधारसिंग सोनाने आदी मोहीम राबवत आहेत.
अल्पवयीनांना वाहने देऊ नका
पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहन देऊच नये. आम्ही जनजागृती मोहीम हाती घेतली असून, मुख्याध्यापक, प्राचार्यांना कळवण्यात येत आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतूक शाखेचे प्रयत्न सुरू आहेत.
- नरेंद्र पाटील,पोलिस निरीक्षक (पश्चिम वाहतूक निरीक्षक)