आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Trainee Psi Who Faces Rape Charges Abscond From Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशिक्षणार्थी पीएसआयवर बलात्काराचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत असलेल्या पंकज तायडे याच्याविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलडाणा पोलिस ठाण्यात कार्यरत एका घटस्फोटित महिला पोलिस शिपायासोबत 2011 मध्ये पोलिस शिपाई पंकज तायडेचे संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, तिची नियुक्ती मेहकर पोलिस ठाण्यात झाली. त्यानंतर ती बुलडाणा येथे आली. पंकज तायडेने ती आपली पत्नी असल्याचे दर्शवून तिला घरही करून दिले होते. खात्यांतर्गत परीक्षा दिल्यानंतर पंकजची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली. त्यानंतर तो नाशिक येथे प्रशिक्षणासाठी गेला. 10 जुलै रोजी पंकजचे अमरावतीच्या एका मुलीशी लग्न झाले. ही माहिती मिळाल्यावर महिला पोलिस शिपायाने पंकजला याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने तिला प्रतिसाद दिला नाही.

या प्रकरणी गुरुवारी महिला पोलिस शिपायाने पंकज तायडेविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि लैंगिक शोषणासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात केली. पंकज हा पाच तोळे सोन्याचा गोफ आणि 90 हजार रुपये घेऊन गेल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक डी. आय. सूर्यवंशी यांनी दिली.

दरम्यान, पंकज तायडेचा शोध घेण्यासाठी मेहकर पोलिसांचे पथक नाशिक येथे गेले होते. मात्र, तेथून तो फरार झाला.