आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Travelling Concession Staff Family Defination Change By Finance Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवास सवलतीसाठी कर्मचारी कुटुंबाच्या व्याख्येत अर्थमंत्र्याकडून बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्सरकारी अधिकारी, कर्मचा-यांसाठीच्या महाराष्ट्र दर्शन व स्वग्राम प्रवास सवलतीत सुधारणा करत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यापूर्वी पती, पत्नी व दोन अपत्यांनाच सवलत होती. आता पती किंवा पत्नी व दोन अपत्यांखेरीज त्यांच्यावर विसंबून असणा-या नातेवाइकांचा समावेश झाला आहे. पुरुष कर्मचा-यांसाठी आई-वडील, अविवाहित भाऊ, बहीण यांचा समावेश असेल. विधवा महिला कर्मचा-यांच्या सासू-सास-यांनाही सवलत मिळेल.