आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटेच नागपूरकर निघतात सायकलवर, वीकेंडचे ठरतात विशेष टूर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - धकाधकीतही डोक्यावर हेल्मेट व हाती ग्लोव्हज घालून पहाटेच शांतपणे सायकल राईडचा आनंद लुटण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. हे वेड अनेकांना एकत्र आणत असून, सामूहिक राइडचा आनंद लुटण्यासाठी ग्रुप्स तयार झाले आहेत. ऑरेंजर्स..हॉक रायडर्स.. सॅडल ऑफ गाइज.. असे कितीतरी. उपराजधानीतील रस्त्यांवर सध्या हे चित्र आहे. वीकेंडला खास सफारी असते. सोशल मीडियावरून हे ग्रुप एकमेकांच्या संपर्कातही असतात. याशिवाय आॅफिसलाही सायकलवरून जाण्याचे कल्चरही वाढत आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याने वाहनांची संख्या भरमसाट असलेल्या निवडक शहरांत नागपूरही आहे. त्यातही जास्त संख्या बाइक्सची आहे. नजीकच्या भविष्यात हे चित्र बदलण्याची चिन्हे नसली तरी नागपूरकरांत सायकल राइडचे पॅशन निर्माण होत आहे. पहाटेच उठून काही कि.मी.चा फेरफटका मारणारे झपाट्याने वाढत आहेत. प्रामुख्याने आयटी कंपन्यांत आॅफिसलाही सायकलने जाण्याचे प्रमाण वाढत आहे. काही जणांनी एकत्र येऊन शहराबाहेर डेली अथवा वीकेंड राइडचा आनंद लुटणारे अनेक ग्रुप तयार केले आहेत. ऑरेंजर्स, हॉक रायडर्स, सॅडल ऑफ गाइज, मॉर्निंग बायकर्स, जाग्वार रायडर्स.. अशी आकर्षक नावेही या ग्रुपना आहेत. फेसबुक आणि वॉट्सअॅपच्या माध्यमातून हे ग्रुप्स एकमेकांना कनेक्टेड असतात. उद्या अथवा पुढच्या विकेंडला कुठल्या मार्गावर सायकल राईड होणार? कुठून आणि किती वाजता निघायचे? अशा योजना तयार होतात. शहराच्या रस्त्यांवर दिसणारे हे चित्र मागील दीड वर्षात तयार झाले आहे, असे नागपूर ऑरेजर्स या ग्रुपचे संचालन करणारे मोहंमद हरीस खान सांगतात. आम्ही सरासरी ताशी २५-३० कि.मी. वेग कायम ठेवतो. नागपुरातील हिंगणा, वर्धा, काटोल, कोराडी, कन्हान मार्ग हे सध्या सायकल रायडर्सचे पसंतीचे मार्ग असल्याचे ते नमूद करतात.

नोकरी सोडून सायकलींचे शोरूम
सायकल राइडच्या वेडापायी अनिरुद्ध रईच यांनी दिल्लीतील इंग्रजी दैनिकातील नोकरी सोडून नागपूर गाठले व एन्सायक्लोपीडिया हे ब्रँडेड विदेशी सायकलींचे शोरूम सुरू केेले. रईच स्वत:ही एक ग्रुप चालवतात.

३० हजार ते दीड लाख किमतीच्या सायकली
ब्रँडेड विदेशी सायकलींची किंमत २० हजारांपासून ते ३-४ लाखांपर्यंत असते. नागपुरात ३० ते ६० हजारांतील सायकलींना जास्त मागणी आहे. कार्बन फ्रेमच्या दीड लाखांच्या सायकल आहेत.
वेड पसरवणार
^आॅफिसमध्ये बैठै काम करणाऱ्यांनी सायकलला प्राधान्य द्यावे. यामुळे व्यायाम होऊन फिटनेस तर राखला जातोच. शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होते. विदर्भासह राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दौरा करून सायकल वापराचा प्रसार करण्याची माझी योजना आहे.
अनिरुद्ध रईच, एन्सायक्लोपीडिया शोरूम
बातम्या आणखी आहेत...