आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trying To Give Guranteed Price For Cotton Cooperative Minister Chandrakant Patil

कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर देण्याचा प्रयत्न - सहकारमंत्री चंद्रकांत पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना किमान हमी भावापेक्षा (एमएसपी) अधिक दर कसा देता येईल, यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असे राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. त्याचप्रमाणे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आणखी प्रस्ताव आल्यास खरेदी केंद्र सुरू करता येतील, असेही ते
म्हणाले.
कापसाला ७ हजार रुपये प्रती क्विंटल एवढा दर मिळावा, अशी शेतक-यांची मागणी असतानाही केंद्राचा हमी भाव कमी असल्याने बाजारात ५,५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी दर शेतक-यांना मिळतो. यावर आमदार सुधाकर देशमुख यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी कापसाच्या दराप्रति सरकारची भूमिका स्पष्ट केली. सहकार मंत्री म्हणाले की, सध्या कापसाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात मंदी असून, ३,७५० रुपये प्रती क्विंटल एवढे सरासरी दर आहेत.
सद्य:स्थितीत कापूस निर्यात खुली आहे. मात्र, आंतराष्ट्रीय बाजारात दर कमी असल्याने त्याचा
परिणाम राज्यात होऊ शकतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात कापूस पणन महासंघाची ७७ आणि सीसीआयचे ६३ खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रावरून आणि व्यापा-यांकडून आतापर्यंत राज्यात ३५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.