आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्करी कार्यालयात लाचखोरी; दोन अभियंत्यांना शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणार्‍या लष्करातील दोन अभियंत्यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी प्रत्येकी दोन वर्षे आणि सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सहायक गॅरिसन अभियंता एकनाथ बरखू सोनवणे आणि कनिष्ठ अभियंता मोहन हरिहरराव जोशी अशी आरोपींची नावे आहेत.

कामठीतील लष्करी कॅन्टोनमेंटमध्ये आवश्यक वीज साहित्य पुरवण्याचे कंत्राट मेसर्स शर्मा इलेक्ट्रिक अँड सर्व्हिसेसला देण्यात आले होते. २००८ मध्ये कन्टोनमेंट कार्यालयात पुरवलेल्या विद्युत सामानाचे बिल कंपनीचे संचालक सूरज शर्मा यांनी सैन्य इलेक्ट्रिक सर्व्हिसेसचे सहायक गॅरिसन अभियंता एकनाथ सोनवणे याला सादर केले होते. शर्मा यांचे देयक मंजूर करण्यासाठी सोनवणे याने ५० हजारांची लाच मागितली. यासंदर्भात शर्मा यांनी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यावरून सीबीआयने सापळा रचला. या सापळ्यात कनिष्ठ अभियंता जोशीने सोनवणेसाठी २५ हजारांची लाच स्वीकारली होती.