आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Fake PA Of Sport Minister Having Eight Names In Their Diary

क्रीडामंत्र्यांच्या तोतया पीएंच्या डायरीत आठ आमदारांची नावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून दोघांनी राज्यातील सुमारे तीनशेहून अधिक जणांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही भामट्यांच्या डायरीत राज्यातील आठ आमदारांची नावे असल्याचेही समोर आले आहे.


अमरावती जिल्ह्यातील आमदारांना गंडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दोन तोतया स्वीय सहायकांना शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत या दोघांची कसून तपासणी सुरू आहे. राज्य सरकारच्या क्रीडा खात्यांतर्गत येणा-या ‘गाव तेथे व्यायामशाळा’ या योजनेचे सरकार दरबारी सादर करण्याचे प्रस्ताव अमरावतीमधील दोन आमदारांना विकत असताना या दोघांना अटक करण्यात आली. प्रवीण शिरसाट आणि सदाशिव भट्टूमिस्त्री वाघ अशी आरोपींची नावे असून ते धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.


डायरीत महत्त्वाच्या नोंदी
दोन्ही भामट्यांकडून पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये जाऊन या दोघांनी प्रस्तावाच्या प्रती विकल्या त्या सर्वांचा उल्लेख डायरीत आहे. ही डायरी गोपनीय दस्तऐवज असल्याने पोलिस त्याची माहिती उघड करण्यास तयार नाहीत. परंतु या दोघांनी राज्यातील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, क्रीडा
संघटनांना गंडा घातला हे मात्र खरे.