आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नैसर्गिक आपत्तीमुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड व तिवसा तालुक्यांतील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे.

राजू विष्णुपंत पुनसे (शेंदोळा खुर्द ता. तिवसा), उत्तम चंद्रभान दापूरकर (45, वरुड) अशी मृतांची नावे आहेत. पुनसे यांच्याकडे तीन एकर शेती असून यंदा त्यांना तीन वेळा सोयाबीन व तुरीची पेरणी करावी लागली. तसेच त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्जही होते. तिसर्‍या वेळीही पेरणी करून पीक समाधानकारक होण्याची शक्यता नसल्यामुळे कर्जाची परतफेड व मुलांचे शिक्षण कसे करावे, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली.

काटी (ता. वरुड) येथील उत्तम दापूरकर यांनी पावसात शेत खरडून गेल्यामुळे विष घेऊन आत्महत्या केली. दापूरकर यांची मुलगी जयर्शी अंध असून, दहावीत शिक्षण घेत आहे. पत्नी नंदा मधुमेह व मुलगा अरुण पोटाच्या आजाराने त्रस्त आहे. दोघांवरील उपचारासाठी त्यांच्यावर अंदाजे 60 हजार रुपयांचे कर्ज झाले. यात सावकारी कर्ज 40 हजार रुपयांचाही समावेश आहे. पीक हातातून गेल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते.
फेडावे, आता जगून काय उपयोग, असे घरी बोलत असतानाच ते जमिनीवर कोसळले. दापूरकर यांनी विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.