आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • \'two Finger\' Tests Ban In India News In Marathi, Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'टू फिंगर टेस्ट\' सरकारनेच ठरविली बेकायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार) नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून बलात्कार पीडित महिलांना दिलासा दिला आहे. बलात्कार पीडित महिलांवरील उपचारासाठी घेण्यात येणारी वादग्रस्त 'टू फिंगर टेस्ट' अखेर बेकायदा ठरविली आहे. 'टू फिंगर टेस्ट' बंद करण्याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दरम्यान, 'टू फिंगर टेस्ट' बेकायदा आणि अवैज्ञानिक ठरवावी, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ही चाचणी राइट टु लाइफ अॅण्ड प्रायव्हेसीचे उल्लंघन होत असल्याचेही सुप्रीम कोर्टात दाखल करण्‍यात आलेल्या एका याचिकेत म्हटले होते.

आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना आरोग्य विज्ञान विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था व देशातील वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बलात्कार पीडितेची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत. बलात्कार पीडितेस प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो. त्यामुळे तिला या स्थितीत मानसिक आधाराची गरज असते. मानसिक धक्क्यातून सावरण्यास मदत करण्यासाठीही नवी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय आहे 'टू फिंगर टेस्ट'