आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मित्रांनीच केला दगडाने ठेचून युवकाचा खून, शोभानगरमध्ये आढळला होता रक्तबंबाळ मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शोभा नगरातराहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. या खुन प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री दोघांना ताब्यात असून त्यांनीच खुन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

सूरज शालीकराम कोठारे असे मृतकाचे नाव आहे. तो बिछायत केंद्रामध्ये काम करत होता. बुधवारी रात्री पावनेबारा वाजताच्या सुमारास मोबाइलवर बोलत तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. गुरुवारी पहाटे रक्तबंबाळ अवस्थेत सूरजचा मृतदेह परिसरातील लोकांना दिसून आला. अज्ञात मारेकऱ्यांनी सूरजच्या डोक्यावर निर्दयीपणे दगडाचे वार केल्यामुळे त्याच्या डोक्याचा पुर्णत: चेंदामेंदा झाल होता. सूरजचा मृतदेह आढळल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली. या वेळी श्वानपथक ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. सदर मारेकऱ्यांच्या शोधासाठी गाडेनगरसह गुन्हे शाखेेचे पथक कार्यरत होते. गुुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी दोघांना पकडले असून त्यांनीच हे कृत्य केले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांनी खुन का केला, कसा केला याबाबत तपास सुरू असल्याचे ठाणेदार पुंडकर यांनी सांगितले आहे.
घटनेची माहीती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. सूरज कोठारे या युवकाचा मित्रांनीच कशासाठी खून केला? घटनेच्यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग यामध्ये आहे का? हा तपास करण्याचे आव्हाण पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. गुरुवारी पहाटे घटना घडल्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शाेध सुरू केला होता. यातच गुरूवारी रात्री पोलिस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले. सुरजच्या अकाली मृत्यूने शोभानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.