आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांना लसीऐवजी अ‍ॅसिड पाजल्याचे, दोन परिचारिकांवर निलंबनाची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गोंदिया जिल्हय़ात तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दोन चिमुकल्यांना प्रतिबंधात्मक लसऐवजी अ‍ॅसिड पाजल्याच्या प्रकरणातील विजया वानखेडे, सुनंदा वाघमारे या दोन परिचारिकांना निलंबित करण्यात आले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली होती.

अ‍ॅसिड देण्यात आलेले चक्रधर कन्हैयालाल भेदे (9 महिने) आणि मुस्कान दिनेश मेर्शाम (14महिने) हे दोन चिमुकले मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर नागपुरातील कोलंबिया खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अँसिडच्या प्रभावामुळे दोघांच्याही अन्ननलिका व घसा अक्षरश: भाजला गेला आहे. रविवारी सकाळी तिरोडा पोलिसांच्या पथकाने या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदवून घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हय़ाची नोंद झालेली नव्हती.