आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नक्षली नेत्यांना सश्रम कारावास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - दोन नक्षली नेत्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. श्रीधर कृष्णन श्रीनिवासन ऊर्फ विष्णू (50), वर्णन स्टॅनलिस गोन्साल्विस ऊर्फ विक्रम (50) अशी त्यांची नावे आहेत. मुंबईत घातपाताचा कट आखत असताना दहशतवादविरोधी पथकाने 2007 मध्ये या दोघांना शस्त्रसाठा व नक्षली साहित्यासह अटक केली होती.

श्रीधरला 6 वर्षे तर वर्णनला 5 वर्षे शिक्षा झाली. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा मात्र सिद्ध झाला नाही. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे विशेष सरकारी वकील पी. सत्यनाथन यांनी सांगितले. श्रीधर हा पिपल्स वॉर या प्रतिबंधित संघटनेचा राज्य सचिव व पॉलीट ब्यूरो सदस्य आहे. तर वर्णन पिपल्स वॉरचा सदस्य आहे. सहआरोपी इश्करा ऊर्फ अँजेला मिलिंद तेलतुंबडची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली पण, तिच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 9व्या नक्षली अधिवेशनात हे सर्व सहभागी होते.