आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंग काढण्याच्या नादात दोघांनी गमावले प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विजेच्या तारांवर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करणा-या नऊ वर्षीय बालकासह दोघांचा मृत्यू झाला. नागपुरात गुरुवारी या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. देवांशू विजय अहेर (वय ९) व राजन पुरण पटेल (१८) अशी मृतांची नावे आहेत.

तिसरीत शिकणारा देवांशू पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर गेला. त्याच्या घरावरून विजेची उच्च दाबाची तार गेली आहे. देवांशूचा पतंग विजेच्या तारावर लटकला. तो काढण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी त्याच्या हाताचा स्पर्श तारेला झाला आणि देवांशूला विजेचा जबर धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुस-या घटनेत राजन गुरुवारी सायंकाळी पतंग उडवत होता. एक पतंग धंतोलीतील शेजारच्या छतावरून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये अडकला होता. राजन हा पतंग काढण्यासाठी घराच्या छतावर चढला. मात्र पतंग काढताना त्याच्या हाताचा तारांना स्पर्श झाला. त्यामुळे मोठ्याने आवाज होऊन तो खाली फेकला गेला. कुटुंबीयांनी रुग्णालयात नेण्यापूर्वीच राजनचाही मृत्यू झाला हाेता.