आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात 24 तासांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, दोघे अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथे 24 तासांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही प्रकरणांतील नराधम आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर येथील बुटीबोरी परिसरात एक चार वर्षीय चिमुरडी अंगणात खेळत होती. या वेळी शेजारी राहणा-या शेरू सिंगने (45) तिला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. शेरू हा मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे, तर दुस-या घटनेत हिंगणा तालुक्यातील सावंगी येथे सातवर्षीय मुलीवर गावातच राहणा-या आकाश दडमल याने (19) बलात्कार केला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली.