अमरावती । वाहतूक शाखेने शुक्रवारी अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या चोवीस दुचाकी जप्त केल्या. अल्पवयीनांना दुचाकी देऊ नका, यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शाळा-महाविद्यालयांचा हंगाम सुरू झाल्याने अल्पवयीन रस्त्यावर दुचाकी दामटताना दिसू लागले आहेत. सदर वाहन सोडण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना 600 रुपायांचा दंड ठोठावण्यात आला आहे तसेच वाहन परवान्याशिवाय विद्यार्थ्यांच्या हातात दुचाकी देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले.