आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बायका अन् फजिती ऐका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - एकाच बायकोला सांभाळताना कसे नाकी नऊ येते, याचे किस्से नेहमीच कानी पडतात. तिथे दोन बायका असणार्‍यांची काय गत? यवतमाळ जिल्हा कारागृहाबाहेर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन सवतींमध्ये झालेल्या फ्रीस्टाइल हाणामारीने ‘दोन बायका फजिती ऐका’ या उक्तीचा पुन्हा एकदा अनुभव आला.
खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली एक आरोपी सध्या यवतमाळच्या जिल्हा कारागृहात आहे. त्याचा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. या आरोपीला दोन बायका आहेत. त्यापैकी एकीला भेटण्यासाठी कैद्याने सोमवारी सकाळची वेळ दिली होती. ही पहिली पत्नी कारागृहाबाहेर आपल्या पतीला भेटण्यासाठी आली होती. मात्र त्याची माहिती दुसर्‍या पत्नीला मिळाली. तीही पतीला भेटण्यासाठी कारागृहाबाहेर हजर झाली. मात्र आरोपीने केवळ एकीलाच भेटण्यास तयार असल्याचे कारागृह कर्मचार्‍यांना सांगितले होते. त्यामुळे कारागृह कर्मचार्‍यांनी केवळ एकीला तिच्या पतीला भेटता येईल, अशी भूमिका घेतली.
पतीला आधी कोण भेटणार? या कारणावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. या दोघींनीही कारागृहाबाहेरच एकमेकींना शिवीगाळ करून चक्क हाणामारीही केली. कारागृहाबाहेर तैनात कर्मचार्‍यांनाही नेमके काय झाले हे कळले नाही. अखेर कारागृह अधिकार्‍यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या दोन्ही बायकांना दुसरीकडे नेऊन त्यांचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला.
कारागृहाबाहेरचा प्रकार
एका कैद्याच्या दोन बायका कारागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी त्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्याने एकीला भेटण्याचे सांगितले होते. या कारणावरून दोघींत भांडण झाले. मात्र आम्ही पोलिसांना बोलावून त्या दोघींना परिसराबाहेर काढून दिले. र्शीकृष्ण भुसारे, कारागृह अधीक्षक.