आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रफुल्ल पटेल यांची गुर्मी शिवसैनिकांनीच उतरवली - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया - शिवसैनिक एकत्र आले तर काय करू शकतात, हे लोकसभा निवडणुकीत दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट उमेदवार प्रफुल्ल पटेल यांची पैशाची गुर्मी उतरून त्यांना तोंडघशी पडावे लागले. आता वेळ येथील सत्तांध आमदाराची आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत या सत्तांध आमदारालाही शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला.

आपल्या राज्यव्यापी दौर्‍याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी गोंदिया येथून शनिवारी केली. सुभाष शाळेच्या मैदानात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, खासदारत्रयी विनायक राऊत, संजय राऊत, कृपाल तुमाने, आमदार अशोक शिंदे व नीलम गोर्‍हे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील पहिला सूर्योदय गोंदियात होतो म्हणून उद्धव ठाकरे यांनी दौर्‍याची सुरुवात गोंदियातून केली. शिवसैनिक त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील. गोंदिया विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार रमेश कुथे यांनी व्यक्त केला.