आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav True Speaking Benefit To Shiv Sena Prakash Ambedkar

उद्धवच्या खरे बोलण्यातच शिवसेनेचा फायदा होता, प्रकाश आंबेडकरांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज भाजपनेच युती तोडल्याचे सांगत आहेत. तुम्हाला गुजरातचे राज्य हवे का? असे भावनिक आवाहन करीत आहे. पण ते खरे बोलले असते तर आज फायद्यात राहिले असते. त्यांना किमान १०० जागा मिळाल्या असत्या, असे विश्लेषण भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

भावनिक आवाहन करण्यापेक्षा शिवसेनेला डावलून महाराष्ट्र इतरांना देण्याचा भाजपचा डाव आहे, हे ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले असते तर जास्त बरे झाले असते, असे ते म्हणाले.
भाजप-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आता स्वतंत्र लढत आहे. या शिवाय मनसे, शेकाप, बसपचेही उमेदवार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होईल व त्याचा फायदा आमच्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीला होईल, असे गणितही आंबेडकरांनी मांडले. कुणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी कसरत करावी लागेल, असे ते म्हणाले.

प्रादेशिक नेतृत्वच नाही
एकाही पक्षाकडे आज सक्षम नेतृत्व नाही. केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून राहिल्याने राष्ट्रीय पक्षांचे राज्यात नेतृत्वच तयार झाले नाही. आवाका नसलेले लोक नेते झाले आहेत. सर्वच पक्ष एकमेकांना ब्लॅकमेल करत आहेत. सर्वच पक्षांनी वेगवेगळे लढणे संघटनेसाठी चांगले आहे. त्यातून पक्षसंघटना मजबूत होते.
प्रकाश आंबेडकर, नागपूर पत्रपरिषदेत