आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिराचा प्रश्न सुटणार, त्यासाठीच माेदींची निवड - उमा भारती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘अयाेध्येत राममंदिर उभारणीच्या वादात केवळ जमिनीच्या मालकीचा वाद शिल्लक आहे. हा वाद न्यायालयाबाहेर चर्चेतूनही सुटणे शक्य आहे. सध्याचे विकासाचे वातावरण लक्षात घेता राममंदिराचा प्रश्न मोदींच्या कार्यकाळात सुटेल, असा विश्वास वाटताे. किंबहुना हा प्रश्न सोडवण्यासाठी नियतीनेच मोदींची निवड केली आहे,’ असे मत केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी साेमवारी व्यक्त केले. पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पाचा लाभ महाराष्ट्रालाही देण्यासाठी गुजरातशी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

गंगा अ‍ॅक्शन प्लॅनवर सरसंघचालक डॉ. भागवत यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. पार-तापी-नर्मदा प्रकल्पावरून काँग्रेसचे नेते सिद्धांतहीन राजकारण करीत आहेत, असे सांगून उमा भारती म्हणाल्या, या नदीजोड प्रकल्पाच्या बदल्यात मुंबईची दमणगंगा व पिंजाल प्रकल्पाच्या माध्यमातून साठ वर्षांच्या पाण्याची सोय होणार आहे. पार, तापीचे पाणी सध्या समुद्रात जाते. त्याचा महाराष्ट्राकडून सध्या वापर होत नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी आम्ही महाराष्ट्राला, तर दुसर्‍या प्रकल्पासाठी गुजरातला राजी केले होते. न्यायालयाच्या निर्देशांवरून आम्ही पाच नद्याजोड प्रकल्प हाती घेऊन निर्णय घेतले. मात्र, तरीही या प्रकल्पाचा काही लाभ महाराष्ट्रालाही व्हावा यासाठी गुजरातशी चर्चा करू, असे त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...