आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर भेटीत वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर राजनाथसिंह यांचे सुचक मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भ हे एक वेगळे राज्य व्हावे असा मुद्दा सध्या गाजतोय, त्यावर आपले मत काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सुचक मौन धारण केले. यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी वेगळ्या विदर्भावर अनुकूलता दर्शविली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजनाथसिंह म्हणाले, की भाजपचे सरकार आल्यानंतर माओवाद्यांच्या कारवाईत मोठी घट झाली आहे. हिंसाचार कमी झाल्याने जनतेत थोड्या फार प्रमाणात सुरक्षिततेचे वातावरण आहे.
माओवाद्यांविरुद्ध लष्करी बळाचा वापर केला जाईल का, या प्रश्नावर मात्र राजनाथसिंह यांनी मत व्यक्त करण्याचे टाळले.
मोदींच्या विदेश दौऱ्यावर राजनाथसिंह म्हणाले, की मोदींच्या दौऱ्यांनी विदेशात देशाची प्रतिमा उंचावली आहे. आर्थिक प्रगती झाली आहे. विकासाचा नवनवीन योजना आणल्या जात आहेत. त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की ते माझ्यावर कायम खुष असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राजनाथसिंह यांच्या नागपूर भेटीचे फोटो....