आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UPA President Sonia Gandhi In Nagpur On 20 November

युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी 20 रोजी नागपुरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते 20 नोव्हेंबर रोजी नागपुरात राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या विस्ताराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. गरीब कुटुंबांना आरोग्य सेवा पुरवणारी ही योजना सध्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्येच लागू आहे. ती आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. विस्तारित योजनेचा शुभारंभ सोनिया गांधी यांच्या हस्ते 20 नोव्हेंबर रोजी नागपुरातून होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मोघे यांनी दिली. नागपुरात या कार्यक्रमाचे स्थळ निश्चित झाले नसले तरी कस्तुरचंद पार्कवर हा कार्यक्रम होण्याची शक्यता असल्याचे मोघे यांनी सांगितले.