नागपूर - ‘उर्दू शायरांनी जीवनाचे वास्तव ना कधी पाहिले ना अनुभवले. त्यामुळे उर्दू शायरीत वास्तवाचे प्रतिबिंब कधी पडलेच नाही,’ असे रोखठोक वास्तव जागतिक कीर्तीचे शायर मुनव्वर राणा यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना मांडले. नागपुरात मुशाय-यासाठी आले असता ते बोलत होते.
एकेकाळी येथे नवाब, मुघल, अमीर-उमराव, यांचे साम्राज्य होते. त्यामुळे त्यांना आवडेल अशी शेरो-शायरी करण्यात येत होती. त्यामुळे मयखाना, शराब, आँखें, मेहबूबा आणि स्त्रीच्या सुडौल शरीराची वर्णनेच शायरीत येत राहिली. बादशहा, नवाब आणि अमीर-उमरावांना खुश करणारी शायरी ते लिहीत राहिले. सामान्य माणसाविषयी लिहिणे, त्याचे प्रश्न मांडणे हा बादशहाविरुद्धचा द्रोह मानला जात असल्याने सामान्य माणसाविषयी कोणी लिहिले नाही. माझ्या मनात ही सल बोचत होती. म्हणून मी वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. शायरीतून गरजू, कामगार व सामान्यांचे प्रश्न मांडले
फेफडों को कारखानो का धुआँ खाने लगा अब ये समंदर बराबर कश्तियाँ खाने लगा
यातून मी कामगारांचे प्रश्न मांडले.
आई आस्थेचा विषय : आई हा विषय उर्दू शायरीत सर्वप्रथम मी आणला. आई हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक हळवा कोपरा असतो.
तिची चादर, दुलई वा कपड्यांतून तिचा स्पर्श आणि मायेची ऊब जाणवत राहते
एक ख्वाब की सूरत ही सही
याद है अब तक
माँ कहती थी, ले ओढले इस
शाल में हम हैं.
शायरांमध्ये विभागणी
रामजन्मभूमी वादानंतर शायरांमध्येही विभागणी झाली. निखळ आनंद देणा-या शायरीतही जातीयवाद शिरला. शायरीतही उर्दू शायर बाबरी मशीद तर हिंदी शायर श्रीरामावर लिहायला लागले. यामुळे शायरीचे व्हायचे ते नुकसान झालेच, असे राणा यांनी स्पष्ट केले.