आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी.जे. आणि हेडफोनचा अधिक वापर घातक, अधिक आवाज देऊ शकतो बहिरेपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- बदललेली जीवनशैली, मायक्रोवेव्ह्स आणि गर्भवती मातांना होणारे अतिरिक्त औषधोपचार या प्रमुख कारणांमुळे सध्या जन्मत: कर्णबधिर बालकांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस हे चित्र गडद होत चालले आहे, असे शहरातील कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. बबन बेलसरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

प्रत्येकच व्यक्ती सध्या बदलते जीवनमान आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकदा त्याचे दुरुपयोग सर्वसामान्यांना लक्षात येत नाही. आज अनेक फळांना पिकवण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर होतो. गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना औषधोपचार केले जातात, त्याचे प्रमाण अतिरिक्त झाल्यास होणार्‍या बाळाच्या कानासाठी ते घातक ठरण्याची शक्यता राहते. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. मोबाइल आज प्रत्येकाकडे आहे. त्याच्या जोडीला असलेल्या हेडफोनचा योग्य वापर केल्यास, प्रमाणात आवाज ऐकल्यास घातक नाही. मात्र, हेडफोनचा आवाज मोठा ठेवला, तर तो कानासाठी निश्चितच धोकादायक ठरू शकतो. तेव्हा काळजी घेतलेली बरी.

कानाचे आजार टाळण्यासाठी काय करावे ? वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..