आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कामाचा दर्जा, खड्डे स्कॅन करणारी आलीयं व्हॅन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - रस्त्याचे स्कॅन करून एकप्रकारे त्याचा एक्स-रे काढणारे तंत्रज्ञान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आणले आहे. राष्ट्रीय महामार्गांचे अद्ययावत सर्वेक्षण करण्याबराेबरच निकृष्ट काम करणा-या ठेकेदारांना चाप बसवण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होईल. तसेच सर्वेक्षणासाठी लागणारा अवधीही कमी हाेईल.

यांचे स्कॅनिंग : रस्त्याचा दर्जा, डांबरीकरण थरांची जाडी, रस्त्यांवरील खड्डे, त्यांचा आकार व स्वरूप, मार्गाची अपघातप्रवणता, अतिक्रमण, वृक्षारोपण आदींचा सरकारला शास्त्रशुद्ध व अचूक डेटा उपलब्ध हाेणार.

असा होणार फायदा
निविदा, कामातील दोष उघड करण्यासाठी फायदेशीर. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराला चाप लावणे शक्य. वाहतूक, अर्थ मंत्रालय, महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, पतपुरवठा संस्था, विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही हा डेटा एका क्लिकवर उपलब्ध होईल. नागपुरातून तीन हजार किमीच्या महामार्गांच्या सर्वेक्षणाचा प्रकल्प सुरू झाला आहे.
पुढे वाचा, कसे आहे तंत्रज्ञान