आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल बंद करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार - एकनाथ शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील टोल संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नागपूर शहरात प्रवेश करणाताना राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणारे टोल रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे का? असा तारांकित प्रश्न चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासह अन्य सदस्यांनी विचारला होता. त्यावर शिंदे यांनी असा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे सांगितले.

यावर पतंगराव कदम यांनी भाजपाने निवडणुकीपूर्वी टोल रद्द करण्याची घोषणा केली होती. टोल बंद करण्याची तारीख राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी केली. आमदार जयदत्त क्षीरसागर, सुनील देशमुख, छगन भुजबळ, गोपाळ अग्रवाल हेही यावर आक्रमक झाले. विरोधकांचा हा हल्ला परतवून लावताना िशंदे यांनी आघाडी सरकारनेच हे करारनामे केले आहेत. राज्य सरकारने राज्यातील टोलचे धोरण ठरवण्याबाबत पी. सी. देशमुख समिती स्थापन करण्यात आली असून दोन महिन्यांत समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होईल. त्यानंतर या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असेही सांगितले.

मुलाखत: सरकारने टोलमुक्तीचे वचन पाळावे
संतोष काळे | मुंबई
> माेटारींना टाेलमाफी देऊन व्यावसायिक वाहनांकडून ताेटा वसूल करण्याचा सरकारचा िवचार आहे, याबद्दल आपले मत काय ?
- महाराष्ट्र टाेलमुक्त हाेईल या अपेक्षेनेच परिवहन आणि उद्याेगाशी िनगडीत सर्वांनी सरकारला पािठंबा िदला हाेता. त्यामुळे सरकारने टाेलमुक्तीचे वचन पूर्ण करावे. माेटारींना माफी आणि त्यातून हाेणा-या ताेट्याची व्यावसाियक वाहनांकडून वसुली जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल.
> आढावा घेण्याबाबत तुमचे मत काय ?
सरकार आढावा घेणार असले तरी टाेलचे पैसे आपल्यालाच भरावे लागणार आहे. वास्तविक हा आढावा घेताना स्टेकहाेल्डर्सना साेबत घ्यायला हवे. दूध देणारी गाय असल्याचे समजून हवे तेवढे पैसे काढा असा समज झाला आहे. पण हे िकती िदवस चालणार? पुन्हा आंदाेलन हाेणार ?
> मात्र तसे झालेच तर काय हाेईल?
एकाला माफी देऊन दुस-यावर भार टाकल्यास वाहतूक खर्च वाढणार. अर्थात त्याचाही भार सामान्यांवर येऊन पुन्हा महागाई वाढणार. जर तुमची नीतीच िनयंत्रणात नसेल तर महागाई कशी िनयंत्रणात येणार. ठिकठिकाणी वाहने थांबण्याची दुखणे कायम राहून पुन्हा टाेलप्लाझासमाेर रांगा लागतील. पण नेमका काय परिणाम हाेईल हे टाेलबाबत पुढची भूमिका काय आहे हे कळल्यावरच सांगता येईल.
> संघटनेची भूमिका काय ?
टाेलमध्ये पारदर्शकता नाही. दोष दूर करावे लागतील. गाड्या नाक्यावर वारंवार थांबल्याने इंधन वाया जाऊन ८७ हजार काेटींचे वार्षिक नुकसान हाेते, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आॅथाॅिरटी सांगते. आम्ही टाेलच्या िवराेधात नाही. परंतु या नुकसानीतून सुटका झाली पाहिजे. आम्ही ‘सीमलेस जर्नी’च्या प्रतिक्षेत आहाेत.
> टाेल संदर्भात आपली मागणी काय ?
टाेल वसूलीसाठी एक पर्यायी मेथाॅडाॅलाॅजी असावी. अशा प्रकारच्या पर्यायांचा वापर करून टाेल प्लाझा हटवावेत व देशासमाेर एक चांगले उदाहरण ठेवावे. सरकारने टाेलमुक्तीचे िदलेल वचन पूर्ण करावे अन्यथा विराेध हाेईलच.