आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Narendra Modi Candidature Declare For The Prime Ministership

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींची उमेदवारी होणार लवकरच घोषणा - राजीव प्रताप रूडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीचे एकमत झाले आहे. लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे भाजप प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.


मोदी यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा व्हायची आहे, असे सांगून रूडी म्हणाले, एक कुशल शासक आणि सर्वाेत्कृष्ट प्रशासक अशी मोदी यांची देशभर प्रतिमा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. यूपीए सरकार म्हणजे घोटाळ्यांचे सरकार, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दुरवस्थेला यूपीए सरकारच
जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. विदेशी गुंतवणूक बंद झाली; पेट्रोल, डिझेलची दरवाढ हा नित्याचाच विषय झाला आहे. महागाई वाढतेच आहे. त्यामुळेच देशासमोर आता नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नसल्याचेही रूडी म्हणाले.


भाजप जिंकणार अडीचशे जागा
पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप 250 जागा जिंकून सत्तेवर येईल, असा दावाही रूडी यांनी केला. भाजपने 2009 च्या निवडणुकीत 18 टक्के मते घेतली होती, तर काँग्रेसला 27 टक्के मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत भाजप 30 टक्के मते घेऊन सत्ता प्राप्त करेल, असा दावाही त्यांनी केला.


फायदा काँग्रेसलाच!
भाजपने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले तर काँग्रेसलाच फायदा होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. संघाच्या मुशीत घडलेल्या मोदी यांना मतदार नाकारतील असा दावाही ठाकरेंनी केला. अमरावती येथे निवडक पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोंदीवर परखड टीका केली.