आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Warmingly Welcomed Chief Minister Devendra Fadanvis In Nagpur

PHOTOS : नागपूरमध्ये अभूतपूर्व उत्साहात मुख्यमंत्री फडणवीसांचे जंगी स्वागत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरात रामनवमीला निघणारी गर्दी अलोट, अभूतपूर्व असते. या उत्सावाची शोभायात्रा पाहण्यास संपूर्ण नागपूर लोटते. रविवारीही उपराजधानीत असाच उत्साह होता, निमित्त होते शहराचे भूमिपुत्र व राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे...
नागपूरच्या इतिहासात इतके देवदुर्लभ स्वागत यापूर्वी कोणाचे झालेले नाही, असा अनुभव उपस्थित नागपूकरांनी बोलून दाखवला. ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी विमानतळ ते धरमपेठेतील फडणवीसांच्या घरापर्यंत होती. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे रविवारी प्रथम शहरात आगमन झाले. त्यावेळी विमानतळाबाहेर पाय ठेवायलाही जागा नव्हती इतकी गर्दी उसळली होती. ढोल-ताशे, संदलच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता. वर्धा रोड तसेच वेस्ट हायकोर्ट रोडवर गर्दीच्या लाटा उसळल्या होत्या.

दुपारी ४.३९ मिनिटांनी जेटच्या विमानाने देवेंद्र फडणवीस आले. सर्वप्रथम त्यांची मुलगी दिविजा, नंतर पत्नी अमृता आणि पाठोपाठ स्वत: देवेंद्र आले. तेथे आधीच तयार असलेल्या रथावर शहर व जिल्ह्यातील सर्व आमदारांसह आरूढ झाले. त्या नंतर मिरवणूक निघाली. सर्वप्रथम हॉटेल प्राईडसमोरील डॉ. हेडगेवार चौकातील डॉ.हेडगेवारांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्या नंतर स्वागत स्वीकारीत दीक्षाभूमी येथे वंदन केले.
विशेष विमान, सुरक्षा नाकारली
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नागपुरात प्रथमच आलेल्या देवेंद्र यांनी विशेष सरकारी विमान नाकारून ‘जेट’च्या इकॉनॉमी क्लासने येणे पसंत केले. तसेच झेड प्लस सुरक्षाही नाकारली. माझ्या शहरातील लोकांमध्ये मिसळण्यात अडचणीची ठरणारी सुरक्षा आपल्याला नको, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

पुष्पवृष्टी अन‌् आतषबाजी
वर्धा रोडवरील हॉटेल रॅडीसन ब्ल्यू समोरील चौकात शिवमुद्रा बँड पथकातर्फ शिवकालीन परंपरेने स्वागत करण्यात आले. लेझीम पथकाच्या तालावर अनेकांनी ताल धरला. चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागपूरकरांनी ख-या अर्थाने रविवारी दिवाळी साजरी केली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेली मिरवणूक धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. मार्गात चौकाचौकांत देवेंद्रावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रत्येकाच्या स्वागताचा त्यांनी नम्रपणे स्वीकार केला.
पुढे पाहा नागपूरमधील CM फडणवीस यांची काही छायाचित्रे....