आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vidarbh Also Separat With Telengana, Prakash Ambedkar Estamation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणासोबत विदर्भही वेगळा होईल, प्रकाश आंबेडकरांचे भाकीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - स्वतंत्र तेलंगणाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर काँग्रेस त्यासोबतच विदर्भालाही वेगळे राज्य दिल्याशिवाय राहणार नाही. कारण विदर्भ नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळे हा पक्ष विदर्भाशी प्रतारणा करणार नाही, असा विश्वास भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


मायावती व नरेंद्र मोदी कुठेही गेले तरी उत्तर प्रदेश व गुजरातचा मुद्दा सोडत नाहीत. राष्‍ट्रीय नेते व्हायचे असेल तर स्टेट लीडरशिपच्या संकल्पनेबाहेर यायला पाहिजे, मात्र हे दोन्ही नेते या संकल्पनेबाहेर यायलाच तयार नाहीत, असा आरोप आंबेडकर यांनी केला.


पूर्वी मुस्लिम कॉँग्रेससोबत आणि ओबीसी भाजपासोबत होते. कॉँग्रेसने मुस्लिम अनुनय केला तर भाजपने हिंदुत्वाचा गजर केला. परंतु अलिकडे कॉँग्रेसने काही प्रश्नावर भूमिका न घेतल्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्यापासून
दूरावत असल्याचे ते म्हणाले. सांगलीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाल्याचेही आंबेडकर म्हणाले.


मुंडेंचा प्रामाणिकपणा
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आता कॉँग्रेस- राष्‍ट्रवादीनेही दाखवावा आणि निवडणूक खर्च, उमेदवाराने केलेला खर्च जाहीर करावा, असे आवाहन आंबेडकर यांनी दिले.