आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण : टक्का वाढणे पथ्यावर, युतीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का बर्‍यापैकी वाढल्याने महायुतीच्या गोटात चैतन्य आहे. गेल्या वेळपेक्षा यंदा दोन ते तीन जास्त जागांची भर पडेल, असा दावा महायुतीचे नेते करत आहेत, तर गतवेळप्रमाणेच पाच- पाच असा बरोबरीतच सामना सुटणार असल्याचे दोन्ही कॉँग्रेसचे नेते सांगतात.

मतदानाचा वाढलेला टक्का प्रस्थापितांच्या विरोधातील असंतोष असून, देशात मोदी लाट असल्यानेच मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडल्याचे महायुतीचे नेते म्हणतात. काही मतदारसंघात मुस्लिम समाजानेही भरघोस मतदान केल्याकडे आघाडीचे नेते लक्ष वेधतात. मतदारसंघनिहाय समीकरणे लक्षात घेता महायुतीच्या दोन-तीन जागा वाढतील, असा जाणकारांचा प्राथमिक अंदाज आहे. 2009 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी पाच जागा होत्या.

या वेळी नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, अमरावती, अकोला येथे अटीतटीची लढत झाली. मोदी लाट नितीन गडकरींच्या पथ्यावर, तर अल्पसंख्याक व दलितांनी फारशी मतविभागणी न होऊ देता विलास मुत्तेमवारांना पाठबळ दिल्याने तंतोतंत भाकीत वर्तविण्याचे धाडस विश्लेषक करत नाहीत. गडचिरोली, रामटेक, चंद्रपूरचा कल युतीकडे दिसला. यवतमाळ-वाशीममध्ये शिवाजीराव मोघेंना अनुकूल असल्याचेही सांगितले जाते. महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.