आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidarbha Political News In Marathi, Upcoming State Election

तिकिटासाठी फील्डिंग: विदर्भातील ‘बाप’ नेत्यांची मुलांच्या राजकीय लाँचिंगसाठी धडपड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विधानसभेच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांची गर्दी होत असताना या गर्दीत आपल्या मुलांचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी पूर्व विदर्भातील अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. मुलांसाठी मतदारसंघ निश्चित करून काहींनी निवडणूकपूर्व मशागतदेखील केली आहे. मुलांचे राजकीय करिअर घडवण्याच्या तयारीत असलेल्या बड्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख, अलीकडेच भाजपवासी झालेले माजी खासदार दत्ता मेघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार, राष्ट्रवादीचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच काँग्रेसचे बडे नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचा समावेश आहे. या साऱ्यांनी मुलांच्या तिकिटांसाठी राजकीय पक्षांकडे फील्डिंग लावली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा दोन मुले, दोन पक्षांत...