आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावसाहेब जोरात; देशमुखही लागले कामाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश गुप्ता यांचा भाजपमध्ये झालेला पुर्नप्रवेश, केंद्रात सत्ता स्थापनेनंतर वविधानसभेत तिकटासाठी वाढलेली इच्छुकांची संख्या, जननविकासकडूनच लढायचे की, अन्य पक्षांची दारे ठोठवायची, या संभ्रमात असलेले माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून नविडणूक तयारी करणारे वदि्यमान आमदार रावसाहेब शेखावत, असे चित्र अमरावतीत निर्माण झाले आहे.
या मतदारसंघात काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे उमेदवार ठरलेले नाहीत. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात आहे, तर आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. मतदारसंघावरून महायुती आणि आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. सुनील देशमुख आणि रावसाहेब शेखावत हे दोन उमेदवार या निवडणुकीतही आमने-सामने येणार हे नििश्चत आहे. मात्र, सुनील देशमुख जनविकासकडून लढतात, की दुसऱ्या पक्षाचा सहारा घेतात, याकडे सध्या मतदारांचे लक्ष आहे. देशमुख यांना भाजपने पक्षात प्रवेश घेण्याचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षीय पातळीवर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाविषयी कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत पृष्टी केलेली नाही. उद्योजक लप्पी जाजोदिया यांनाही भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा प्रचार त्यांच्या समर्थकांनी केला होता.
त्यातच, भाजमध्ये वविधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ते किरण पातुरकर, जगदीश गुप्ता आणि शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्यातच तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. मागील अनेक वर्षे या मतदारसंघात कॉंग्रेस विरुद्ध भाजप, अशीच लढत झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत सुनील देशमुख यांची काँग्रेसने तिकीट कापल्याने जनविकास काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अशी लढत अमरावतीकरांनी अनुभवली होती. सुनील देशमुख विरुद्ध रावसाहेब शेखावत या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. रावसाहेब शेखावत अमरावतीचे उमेदवार असताना त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्या. त्यामुळे अमरावतीच्या या निवडणुकीकडे देशाचेच नव्हे, तर साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. या वेळी ही अमरावती मतदारसंघातील संभाव्य नावांमुळे निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
भाजपमध्ये १६ दावेदार : काँग्रेसचा परंपरागत विरोधक असलेल्या भाजपमध्ये अमरावती मतदारसंघात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ते किरण पातुरकर, जगदीश गुप्ता आणि शहर अध्यक्ष तुषार भारतीय यांच्यातच तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. या व्यतिरिक्त रवींद्र खांडेकर,किरणताई महल्ले, प्रदीप शिंगोरे प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा पक्षनिरीक्षकांसमोर व्यक्त केली होती. त्यामुळे अमरावती वविधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट आहे.
दर्यापूरमध्ये चालेल राणेंची मर्जी
पूर्वाश्रमीचे शविसैनिक असलेले सिध्दार्थ वानखडे यांनी दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकटावर लढण्याची तयारी चालवली आहे. 2009 मधील निवडणुकीतच सिध्दार्थ वानखडे यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर दावा केला होता. मात्र, अभिजित अडसूळ यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यामुळे वानखडे यांनी शविसेनेला रामराम ठोकला. सिध्दार्थ वानखडे हे नारायण राणे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात.

राणे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यामुळे वानखडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त डॉ. कैलाश जपसरे, श्रीराम नेहर आणि सुधाकर तलवारे या तिघांनीही काँग्रेसच्या तििकटावर लढण्यासाठी उमेदवारी मागितली आहे. यांपैकी श्रीराम नेहर हे काँग्रेसच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. जलि्हा परिषदेच्या राजकारणात नेहर यांचा चांगलाच हातखंडा आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते, यावर विजयाची समीकरणे अवलंबून आहेत. अपक्षांसह मनसे, रिपाइं ,भािरप-बमसंही रिंगणात आहेत.

मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले बळवंत वानखडे यांनी या वेळी नविडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. जलि्हा परिषदेच्या राजकारणातून बळवंत वानखडे यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे, तर रिपाइंकडून या वेळीही रामेश्वर अभ्यंकर नविडणूक लढवणार आहेत. गेल्या वेळी अभ्यंकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. मनसेकडून गोपाल चंदन दर्यापूरमधून नविडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. भािरप-बहुजन महासंघाने या मतदारसंघातून एका महलिा उमेदवाराला लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मतदारसंघाची पार्श्वभूमी राज्याच्या स्थापनेनंतर 1962 मध्येच दर्यापूर मतदारसंघ अस्तित्वात आला. वदिर्भातील खारपाणपट्ट्याचा मोठा भाग या मतदारसंघामध्ये आहे. काँग्रेस, रिपाइं फॉरवर्ड ब्लॉक आणि शिवसेना, अशा सर्वच पक्षांचे उमेदवार येथून विजयी झालेत. मात्र, मागील सहा निवडणुकांपासून या मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीचेच वर्चस्व आहे.