आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भासाठी पुढाकार घ्या, अन्यथा विधानसभेतही पराभव : मुत्तेमवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाला वैदर्भीय जनतेच्या संतापाचा सामना करावा लागेल,’ अशी भीती माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे.

विदर्भाच्या मागणीकडे झालेले दुर्लक्ष पराभवास कारणीभूत ठरले आहे. जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा. भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संसदेत विधेयक आणण्यासाठी दबाव केंद्रावर वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मुत्तेमवार म्हणाले.