आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख पक्षांचे वेट अँड वॉच; अपक्षांचा जनसंपर्कावर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात विधानसभा नविडणुकीची रणधुमाळी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सुरू झाली आहे. जागावाटपाच्या सूत्रावर एकमत होत नसल्याने आघाडी, महायुतीत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता असली, तरी अपक्षांनी मात्र मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील दोन नविडणुकांपासून बडनेरा विधानसभा मतदारसंघ दिग्गजांमुळे ‘हायप्रोफाइल’ ठरत आहे. आगामी नविडणुकीसाठीदेखील सर्वच राजकीय पक्षांतील दिग्गज येथून नविडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येथील नविडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. आदर्श आचारसंहिता आरंभ होण्यास थोड्याच दविसांचा कालावधी शिल्लक असून, उमेदवार नशि्चति न झाल्याने राजकीय पक्षांतील नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांची ‘फिल्डिंग’ लावण्यात गुंतले आहेत, याचाच लाभ उठवत अपक्ष उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्याकडे लक्ष केंद्रति केले आहे.
जिल्ह्यात वेगळ्या वदिर्भाचा आवाज बुलंद केलेल्या एका स्थानिक नेत्याने, तर बडनेरा मतदारसंघात घरोघरी पोहोचण्यासाठी शक्कल लढवल्याचे दिसून येत आहे. तुमच्या घरी मतदार कतिी, घरातील सदस्य कतिी, असे काहीसे प्रश्न सद्य:स्थतिीत बडनेराकरांच्या कानावर पडताना दिसून येत आहे. घरातील वरिष्ठ सदस्याचे नाव, कुटुंबातील एकूण मतदारांची यादी गोळा करणाऱ्या महिला घरोघरी चौकशी करताना आढळून येत आहेत. घरोघरी या वदिर्भवादी नेत्याचे आवाहन असलेले पत्रकदेखील देण्यास सर्व्हे करणारे कार्यकर्ते देण्यास विसरत नाहीत. मतदारसंघातील परविारांचा डाटा तर तयार होईलच; मात्र त्यासोबत राजकीय पक्षाच्या उमेदवार पोहोचण्यापूर्वी घराघरांत जाण्याचा चंग अपक्ष नविडणूक लढवण्याऱ्या वदिर्भवादी नेत्याने बांधला असल्याचे दिसून येत आहे.
गावांमध्येही दौरे
सर्वेक्षणातून घराघरांत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना अपक्ष उमेदवारांकडून मतदारसंघातील गावांमध्ये दौरे आयोजति करण्यात येत आहेत. पूर्वीची ओळखीचा हवाला देत, आगामी विधानसभा नविडणुकीत आपणसुद्धा आखाड्यात उतरणार आहोत, असे आवर्जून सांगितले जात आहे.