आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता ‘घरधनी’ मला परत द्या,शेतक-याच्या पत्नीचा टाहो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील महागर्जना रॅलीला गेलेला शेतकरी तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी घरी परतला नाही, त्यांच्याबद्दल काही माहिती मिळवण्याचे सौजन्य भाजपने दाखवले नाही. ज्या जिल्ह्यातील शेतकरी बेपत्ता झाला त्याच जिल्ह्यातून मोदी महाराष्‍ट्रातील लोकसभा प्रचाराचा नारळ फोडत असल्याने ‘महागर्जनेत बेपत्ता झालेला माझा घरधनी मला परत करा,’ असा टाहो शेतक-यांची पत्नी सुनंदा समर्थ फोडत आहेत.


पुरुषोत्तम ऊर्फ पुसाराम बापूराव समर्थ (62) असे बेपत्ता शेतक-याचे नाव असून ते हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर(बाई)चे रहिवासी आहेत. 22 डिसेंबरला मुंबईत नरेंद्र मोदींच्या महागर्जना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला भाजप तालुकाध्यक्ष पुंडलिक तिजारे यांच्या आग्रहास्तव समर्थ घराबाहेर पडल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात येत आहे. तीन महिन्यांचा कालावधी पार पडला तरी ते घरी परतले नाहीत.