आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन दिवस जलसंकट; 2 व 3 जुलैला नाही पाणी; दुरुस्तीमुळे होणार गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भ महाविद्यालय परिसरातील जलकुंभाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने दोन व तीन जुलै रोजी निम्म्या शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्पष्ट केले आहे.

दुरुस्तीदरम्यान कठोरा नाका, विद्युतनगर, विदर्भ महाविद्यालय परिसर, उज्ज्वल कॉलनी, रंगोली लॉनच्या मागील परिसर, फ्रेंड्स कॉलनी, नवसारी, लक्ष्मीनगर, विलासनगर, राठीनगर, गाडगेनगर, रामपुरी कॅम्प, पॅराडाइज कॉलनी, नूरनगर, गुलिस्तानगर, हबीबनगर, जमील कॉलनी, चांदणी चौक, पठाण चौक, सातखिराडी, पटवीपुरा, लालखडी व जवाहर गेटच्या आतील भागाला पाणी मिळणार नाही. कठोरा नाका-विमवि परिसरातील हा जलकुंभ 15 लाख लिटर क्षमतेचा आहे.

व्हॉल्व्ह दुरुस्ती आवश्यक
४जलकुंभावरील व्हॉल्व्ह बदलवायचा असल्यामुळे ही वेळ उद्भवली. व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नव्हते. विजेचा अतिरिक्त दाब वापरून काही नागरिक पाणी घेत होते, तर इतरांना अत्यंत कमी पाणी मिळत होते. ही अडचण आता दूर होईल.
अरविंद सोनार, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.