आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • We Oppose To Ceiling Ordinance Says Deputy Chief Minister Ajit Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काहीही झाले तरी सीलिंग कायदा नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- ‘नुकताच एका संकेतस्थळावर नवीन सीलिंग कायद्याचा मसुदा आला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी या नवीन कायद्याने हवालदिल झालेत. हा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. काहीही झाले तरी हा कायदा आणू देणार नाही’, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती प्रेरणाशिल्पाचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कराव जाधव होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री बबनराव पाचपुते, डॉ. राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती होती.

पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या विविध भागांत ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. विदर्भात अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने जून, जुलै महिन्यातील नुकसानीचे सर्वेक्षण केले. विदर्भात पुन्हा ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. विदर्भातील शेतक-यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासन जास्तीत जास्त आर्थिक मदत करणार आहे,’’ असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा प्रसार करण्याचे काम मोतीराम ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री सुभाष ठाकरे करीत असल्याचेही ते म्हणाले.