आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईहून शस्त्रांची नागपुरात तस्करी, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून गुन्हेगारांना आवश्यक शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी मुंबईहून नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास नागपुरातील तहसील पोलिसांनी मोमीनपुरा येथील आबिद जनरल स्टोअर्सवर छापा टाकून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यात चायनिज बनावटीचे तलवार, खंजीर, कुकरी, चाकू, सुरे, गुप्ती आणि पिस्तूलसारखे दोनशेवर घातक शस्त्रांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक पंडित अर्जुन भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद नईम जैजुल अाबिदीन अन्सारी (४९) रा. मोमीनपुरा याने मार्च महिन्यात मुंबईहून हा शस्त्रसाठा जनरल स्टोअर्सच्या सामानांमध्ये भरून रेल्वेने नागपुरात आणला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात हुडकेश्वर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चायनिज बनावटीचा एक चाकू सापडला. त्याबद्दल पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी अन्सारीच्या दुकानाचे नाव घेतले. या माहितीच्या अाधारावर पोलिसांनी अन्सारीच्या दुकानावर धाड टाकली. यावेळी पोलिसांना दुकानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढहूहन आला. रेल्वेतून शस्त्रांची तस्करी होत असताना रेल्वे सुरक्षा व्यवस्था काय करत होती? असा सवाल उपस्थित केले जात आहेत.

पथक मुंबईला रवाना
अन्सारी याने मुंबईहून हा शस्त्रसाठा नागपुरात आणला. ही माहिती मिळताच मुंबईतून नागपुरात शस्त्रे पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले आहे.

नागपुरात अवैध शस्त्रांची बाजारपेठ
गेल्या काही वर्षांत नागपूरचा विकास झपाट्याने होत असून, गुन्हेगारीही वाढली आहे. गुंडांना शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी नागपुरातील मोमीनपुरा भागात अवैध शस्त्रांची बाजारपेठच विकसित झाली असून बहुतांश जनरल स्टोअर्सच्या आडून शस्त्रांची तस्करी व विक्री केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...