आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का साजरा करतात एप्रिल फुल?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आज सगळ्यांना फुल अर्थात मुर्ख बनवण्‍याचा दिवस. या दिवशी कोणीही कोणालाही मुर्ख बनवतो. येथे वयाची अट नसते. फक्त असते निखळ आनंद लुटण्‍याची तयारी. एप्रिल फुलवर हिंदी चित्रपटसृष्‍टीत एक मजेशीर गाणं आहे. ते असे, एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्‍सा आया, इसमें मेरा क्या कसूर, जमाने का कसूर जिसने ये दस्तूर बनाया.

*एप्रिल फुल साजरा करण्‍याचा इतिहास
एप्रिल फुल साजरा करण्‍याबाबत काही संदर्भ सांगितले जातात ;
* फ्रान्सने ग्रेगरियन कॅलेंडर अमान्य केल्याने युरोपात त्यांना फुल्स म्हणून चिडवण्‍यात आले. याचे निमित्त साधून 1 एप्रिल म्हणजे एप्रिल फुल असे समीकरण तयार झाले.
* जोसेफ बास्कीन या इतिहासाच्या प्राध्‍यापकाच्या मतानुसार कॉंस्‍टंटाइन या साम्राज्याच्या राजाच्‍या दरबारातील काही विदूषकांनी राज्यकारभारावरून डिवचले होते. त्यामुळे राजाने त्यांना एका दिवसाकरिता राज्यकारभार करण्‍याची संधी दिली. या विदुषकांनी मुर्खपणाचे अनेक आदेश दिले. त्यावेळी दरवर्षी यादिवशी काहीतरी विचित्रपणा करावा असे आदेश राजाने दिले होते. तेव्हापासून ही प्रथा रूढ झाली.
* काही देशांमध्‍ये मार्च हा महिना आर्थिक घडामोडींची शेवटचा महिना असल्याने अनेक कामे या महिन्यात पूर्ण केली जातात. त्यावेळी कामात गुंतलेले कर्मचारी प्रचंड थकतात.त्यांचा थकवा घालवण्‍यासाठी काहीतरी विरंगुळा करावा यासाठी ही प्रथा रूढी झाली.