आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Smugglar Arrested By Akola Forest Divison

सर्पविषाची तस्करी करणारी टोळी जेरबंद,अकोला वनविभागाची कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कोब्रा सापाच्या विषाची तस्करी करणा-या टोळीचा अकोला वनविभागाने गुरुवारी पर्दाफाश केला. नागपूर व अकोल्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 35 मिलिलिटर विष जप्त केले. कोब्राच्या विषाची तस्करी होत असल्याची माहिती तीन महिन्यांपूर्वी वनविभागातील अधिका-यांना मिळाली होती. यानंतर सापळा रचत आरोपींना अटक करण्यात आली.


परेश पारेख (39 रा. नागपूर,) रमेश कटारिया (53 रा. अकोला), अमित भातेकर (रा. नागपूर) व विश्वजित विठ्ठल वानखडे (45 रा. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. वनविभागाने एक बनावट ग्राहक पाठवत एक महिन्यापूर्वी या चारही तस्करांशी संपर्क साधला होता. त्यानुसार परेश पारेख याने सर्पविष मिळणार असल्याचे ग्राहकाला सांगितले. कृषी विद्यापीठातील विश्रामगृहामध्ये मुक्काम केल्यानंतर 20 जूनला डील करण्याचे ठरविले. त्यानुसार शिवाजी महाविद्यालयासमोरील संगम स्टुडिओमध्ये पारेख व कटारिया या दोन तस्करांनी अधिका-यांना बोलावून घेतले. स्टुडिओमध्ये 5 मिलिलिटर विष चाचणीसाठी आणण्यात आले. पारेख व ग्राहक यांच्यात विष व्यवहार होताच छापा मारून दोघांनाही 35 मिलिलिटर विषासह अटक केली. या विषाचा नशेसाठी वापर होत असल्याचे समजते.