आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २४ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधानसभेत ही माहिती दिली. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थितीत कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यात अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. २२, २३ आणि २४ डिसेंबर असे तीन दिवस कामकाज होणार आहे.
२३ डिसेंबरला अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि २४ तारखेला समारोप होणार आहे, तर अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केली.