आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wireless Coin Box In Nagpur Jail For Prisoner News In Divyamarathi

नागपूर कारागृहात लागणार वायरलेस कॉइन बॉक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहात वायरलेस कॉइन बॉक्स लावण्याचा प्रस्ताव ‘बीएसएनएल’ पाठवला आहे, अशी माहिती राज्य सरकारने साेमवारी एका प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील फाशीची शिक्षा भोगत असलेल्या दहशतवाद्याने कुटुंबीयांशी बोलण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात दूरध्वनी लावण्याची विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर राज्य सररकारने उत्तर दाखल केले. मुंबईतील "गेट वे ऑफ इंडिया' समोर अशरत शफिक अन्सारीने साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. सन २००२ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. अन्सारी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अतिरेक्याला कुटुंबीयांशी बोलण्यासाठी अडचणी निर्माण होतात. याबाबत त्याने प्रशासनाकडे दूरध्वनी लावण्याची मागणी केली. मात्र, मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्याने खंडपीठात धाव घेतली हाेती.