आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Modi No Face To BJP, Raj Thackeray Crtise, Divya Marathi

पंतप्रधान मोदींशिवाय भाजपकडे चेहराच नाही, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्राचे भाग्य यापुढे केंद्र नव्हे, तर महाराष्ट्रच ठरवेल, असे ठणकावून सांगतानाच भाजपकडे नरेंद्र मोदींशिवाय दुसरा चेहरा नाही, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी येथे केली. नागपूर येथील झिंगाबाई टाकळी मैदानात बुधवारी रात्री झालेल्या सभेत ते बोलत होते.

भाजपच्या जाहिरातींमध्ये नरेंद्र मोदी यांचाच चेहरा ठळकपणे वापरला जातो. कारण राज्यात भाजपकडे मते िमळवून देणारा चेहराच नाही. म्हणून लोकसभेनंतर विधानसभेतही भाजपची सारी भिस्त नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे, अशी टीका राज यांनी केली. लोकसभेत जनतेने भाजपला निवडून दिले; पण विधानसभेत आम्हाला राष्ट्रीय पक्षाची गरज नाही. आमचे आम्ही पाहून घेऊ. यापुढे महाराष्ट्राचे भाग्य केंद्राने ठरवू नये, असेही ते म्हणाले.

‘कमकुवत विरोधी पक्षांमुळे महाराष्ट्रात आघाडी सरकार टिकले. भाजप- शिवसेना असो वा काँग्रेस-राष्ट्रवादी असो, हे सर्व पक्ष आतून एकत्र आहेत. एकमेकांना सांगून युती आणि आघाडी तोडत आहेत. युती तुटून आघाडी फुटल्यानंतर या चारही पक्षांनी घोडेबाजार मांडला,’ असेही राज म्हणाले.

शिवसेनेची खिल्ली
महाराष्ट्रात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही, असे सांगताना राज यांनी शिवसेनेचे नाव न घेता टीका केली. तिरंदाजीत आपण माघारलो, असे सांगताना ‘आमच्याकडे केवळ चिन्हच. ते कोणाच्या हातात पण देत नाही अन् त्यातून बाणही सुटत नाही,’ अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली.