आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलांच्या प्रशिक्षणासाठी सव्वा लाखाचे अनुदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महिलांच्या विकासासाठी सुरू असलेल्या अनेक जुन्या योजनांमध्ये कालानुरूप बदल करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार कालबाह्य योजना गुंडाळल्या असून, महिलांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी आवश्यक महिलांच्या प्रशिक्षणासाठी आता सव्वा लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील महिलांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची योजना विभागाने 1985 मध्ये सुरू केली. त्यात प्रामुख्याने संगणक, रेडिओ, टीव्ही दुरुस्ती प्रशिक्षण, विजेच्या उपकरणांची दुरुस्तीचे प्रशिक्षण, टंकलेखन, लघू टंकलेखन, भरतकाम, फलोत्पादन, रेशीम उद्योग, खेळणी तयार करणे, कृषी आधारित व्यवसाय आदींच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. अशाप्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देणार्‍या महिला मंडळांपूर्वी 21 हजार रुपये अनुदान मिळायचे. 21 हजार रुपयांमध्ये केंद्रांना 30 महिलांना सहा महिने प्रशिक्षण, प्रत्येक महिलेला 75 रुपये विद्यावेतन, प्रशिक्षण केंद्राच्या खोलीसाठी 150 रुपये भाडे तत्त्वावर खोली, 650 रुपये निर्देशिकेचे मासिक मानधन ठरवून दिले होते. परंतु महिला व बालविकास विभागाने 1985 मध्ये घालून दिलेले आज कालबाह्य ठरले. त्यामुळे योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय विभागाने घेतला.

लग्नासाठी मिळणार 10 हजार
निराधार, विधवा महिलांना मुलींच्या लग्नाकरिता महिला व बालविकास विभागाकडून मिळणार्‍या अनुदानात यंदा 8 हजार रुपयांनी वाढ केली आहे. पूर्वी अशा महिलांना दोन हजार रुपये मिळायचे. आता 10 हजार रुपये मिळतील.