आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. मीनाक्षी जयस्वाल यांना अखेरचा निराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस (जि. यवतमाळ) - महिला व बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. मीनाक्षी संतोष जयस्वाल यांचा मुंबईतील राहत्या घरी खून झाल्याचे शनविारी सकाळी उघडकीस आले होते. रवविारी त्यांच्या सासरी दिग्रस येथील स्मशानभूमीत शाेकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थविावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक आणि ववििध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
खारघरच्या वास्तुविहार सोसायटीतील नविासस्थानी शनविारी पहाटे अॅड. मीनाक्षी जयस्वाल मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. अज्ञात चाेरट्यांनी त्यांची हत्या केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मीनाक्षी यांचे पार्थवि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दिग्रस हे त्यांचे सासर असल्यामुळे मीनाक्षी यांच्या पार्थविावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मीनाक्षी यांचे माहेर मूर्तिजापूर येथे आहे. त्यांचे पती संतोष जयस्वाल हे धुळे जिल्ह्यातील मालेगाव येथे न्यायाधीश आहेत.
शिर्डीच्याही सल्लागार
अॅड. मीनाक्षी यांनी वविाहानंतर शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयात काम सुरू केले. महिला व बालकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना महिला व बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. एवढेच नव्हे, तर शिर्डी येथील साई संस्थानच्या कायदेविषयक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांची दोन मुले डॉ. विद्यासागर आणि डॉ. तेजस हे उच्च शिक्षण घेत आहेत. मीनाक्षी यांचे ‘विधी साक्षरतेने कायद्याचे राज्य’ हे पुस्तक उपयुक्त ठरले आहे.