आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनाथवाडीत तासभर थरार; नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही आरोपी पोलिसात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्रीनाथवाडी परिसरात शनिवारी भरदिवसा सेल्समनने घरात घुसून महिलेसोबत धक्काबुक्की करण्याची धक्कादायक घटना घडली. त्याने महिलेसोबत असभ्य वर्तनही केले. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह घरात असलेल्या महिलेने घाबरून आरडाओरड केल्यानंतर या सेल्समनने पळ काढला. मात्र, नागरिकांनी त्याला गाठून जोरदार चोप दिला व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
दीपक जयनारायण पंडित (२१) आणि हेमंत दिनेश रघुवंशी (२१, दोघेही रा. इंदोर, ह. मु. दस्तुरनगर, अमरावती) यांना पोिलसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूला श्रीनाथवाडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास संबंधित महिला आपल्या चिमुकल्यासह घरात होती. पती व्यवसायािनमित्त बाहेर गेले होते, तर मुलगी शाळेत गेली होती. याच दरम्यान, तीन सेल्समन गॅस लायटर व अन्य साहित्याच्या विक्रीसाठी पोहोचले. महिलेने वस्तू पाहून नको असल्याचे सांिगतले आणि बाहेरचे गेट बंद करून घरात गेली. तोच तिघांपैकी एक सेल्समन बंद फाटकावरून घरात िशरला व वस्तू घ्यावीच लागणार, असा आग्रह त्याने केला. या प्रकारामुळे संबंधित महिला चांगलीच घाबरली. सेल्समनने याच दरम्यान असभ्य वर्तन केले. दरम्यान, महिलेची सहा वर्षीय मुलगी शाळेतून घरी आली. ितला हा प्रकार दिसताच ती रडायला लागली. घाबरलेल्या महिलेने आरडाओरड करताच शेजारचे गृहस्थ धावून आले. त्याचबरोबर घरात घुसलेल्या सेल्समेनसह अन्य दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांना हा प्रकार कळताच त्यांना पाठलाग करून एका सेल्समनला पकडले. त्यांनी त्याला चांगलाच चोपला. दुसरीकडे, या प्रकाराची माहिती खोलापुरी गेट पोलिसांना देण्यात आली. इंद्रजित राठोड, संदीप चव्हाण आदी पोलिस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना नागरिकांच्या तावडीतून एका सेल्समनला ताब्यात घेतले. घटनाक्रमामुळे श्रीनाथवाडी परिसरातील शेकडो नागरिक गोळा झाले होते. दरम्यान, नागरिकांना दुसऱ्या सेल्ममनलाही पकडले. पोलिसांना दोघांनाही ठाण्यात आणले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघा सेल्समनविरुद्ध जबरीने घरात प्रवेश करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजारी वेळीच धावून आल्यामुळे टळला अनर्थ
सेल्समनने महिलेसोबत असभ्य वर्तन केले. या आकस्मिक घटनेमुळे महिला व चिमुकले चांगलेच घाबरले होेते. त्यांनी आरडाओरड केल्यावर काही क्षण कुणीच आले नाहीत. मात्र, शेजाऱ्यास आवाज येताच त्यांनी धाव घेतली व सेल्समन घरातून पळाला. नागरिकांच्या मदतीने दोघा सेल्समनला पकडण्यात आले. शेजारी पोहोचले नसते, तर कदाचित अनर्थ घडू शकला असता, अशी चर्चा परिसरात सुरू होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य बघता, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
गंभीर प्रकार, गुन्हा दाखल करणार
घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. दोघा सेल्समनला पकडून ठाण्यात आणले आहे. त्यांच्यािवरुद्ध जबरीने घरात प्रवेश करणे, विनयभंग आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करणार आहे.
अनिल राऊत, ठाणेदार, खोलापुरी गेट.