आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला ग्रामीण पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार; खातेदारांचे आज साखळी तर उद्या ‘राळेगाव बंद’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगाव - महिला ग्रामीण पतसंस्थेत वारंवार पाठपुरावा करूनही तीन, चार महिन्यांपासून पैसे परत करण्यात येत नसल्याचा संताप खातेदारांनी व्यक्त केला आहे. बँकेसाठी कार्यरत अभिकर्त्यांनी आठवडाभरापासून उपोषण चालवले आहे. एकूणच, महिला पतसंस्थेच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात खातेदार, ग्राहकांनी एल्गार पुकारला आहे.

याप्रकरणी सोमवारी (दि. 18) तालुक्यातील शंभरावर खातेदार, ग्राहक, नागरिक मिळून साखळी उपोषण करणार आहेत. आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. 19) राळेगाव बंदचे आवाहनही करण्यात येणार आहे.
सहायक निबंधकांचे हातावर घडी, तोंडावर बोट
याप्रकरणी सहायक निबंधकांकडे खातेदार आणि ग्राहकांनी अनेकदा तक्रारी केल्यात. मात्र, त्यांच्याकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याची तक्रार आहे. निबंधकांनी घेतलेल्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचीही खातेदारांची तक्रार आहे.
वसंत पुरके यांची केवळ औपचारिकता
मतदारसंघाचे नेते असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण मंडपी भेट दिली. मात्र, कुठलीच ठोस कारवाई केली नाही. या वेळी केवळ उच्च् अधिकार्‍यांनी कारवाई करावी, असे सांगत त्यांनी काढता पाय घेतला.