आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची हत्या करून जाळले; गोंदिया जिल्ह्यात खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आठवडी बाजारासाठी गेलेल्या महिलेची हत्या करून मृतदेह शेतात जाळल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात रविवारी घडली. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा कुटुंबीयांना संशय आहे.
रावणवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कासा येथील फुलवंता जमरे या काटी येथे बाजारासाठी गेल्या होत्या. परतताना गावालगतच्या शेतात नेऊन त्यांची हत्या करून मृतदेह धानाच्या ढिगात जाळण्यात आला. ही घटना सोमवारी उजेडात आली. धानाच्या ढिगाजवळ फुलवंताच्या पिशवीतील कांदे, वांगे, टोमॅटो पडलेले दिसले तसेच कानातील बाळी, चप्पल आढळली. त्यामुळे लोकांना संशय आला. धानाच्या ढिगात फुलवंता यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली.