आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Should Be Careful While Using Social Networking Sites

‘सायबर’ महिलांनो, सावध व्‍हा; सोशल साइटचा जपून करा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सध्या परप्रांतात शिकवणी वर्गासाठी राहत असलेल्या एका 16 वर्षीय युवतीचे छायाचित्र मर्ज करून अश्लील छायाचित्र फेसबूकवर अपलोड करण्यात आले. याप्रकरणी गुरुवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर क्राइमच्या घटनांना उजाळा मिळाला. त्यामुळे महिलांनी इंटरनेट हाताळताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

थोड्याशा चुकीमुळे किंवा असावधानतेमुळे त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. त्याच्या वापराविषयी तज्ज्ञांनीसुद्धा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडे ‘कॉलेजगोइंग’ तरुण-तरुणींमध्ये सोशल नेटवर्किंग साइटच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. अगदी क्षुल्लक गोष्टही ‘प्रोफाइल अपडेट’च्या माध्यमातून क्षणातच जगभरात पोहोचते. त्यामुळे कित्येकांचे वैयक्तिक आयुष्यही उघड होत आहे. आवडीपोटी किंवा आम्हीही कुठे कमी नाही, हे दाखवण्याच्या हव्यासापायी अनेक तरुणी आपले फोटो किंवा व्हिडीओ क्लिपिंग सोशल साइटवर अपलोड करतात. काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्याचा गैरफायदा घेतात.

बदनामी करण्याच्या नावाखाली असे लोक तरुणी, महिलांचे लैंगिक शोषण करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, फेसबूकवर कुटुंबीयांचे फोटो किंवा व्हिडीओ क्लिपिंग अपलोड करणे कटाक्षाने टाळा. नेट बँकिंगसंदर्भात गुन्हा करताना याच माहितीचा आधार घेतला जातो. कारण नेट बँकिंगवर कुटुंबीयांचे नाव वगैरे अशा बाबींची माहिती देऊन अकाउंट अँक्सेस करता येते. याशिवाय दूर देशी राहणार्‍या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी वेबकॅमचा वापर केला जातो. मात्र, प्रत्येक वेळी काम झाल्यानंतर निष्काळजीपणामुळे त्याचा प्लग काढून तो व्यवस्थित बंद झाला आहे की नाही, याची खात्री करून घेतली जात नाही. त्यामुळे त्याचेही गंभीर परिणाम होतात. इंटरनेटवरील प्रोफाइलवर 90 टक्के माहिती खोटी असते. त्यामुळे फसवणुकीचे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला, तरुणींसोबत अन्याय, अत्याचार घडल्यानंतर त्या तक्रार दाखल करण्यासाठी निर्भीडपणे पुढे येत नाहीत. तरुणीवर अत्याचार झाला असेल, तर यात तिचा काहीच दोष नाही. प्रतिष्ठेपायी किंवा अब्रूच्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे कुटुंबीयांकडून प्रकरण दडपले जाते. परंतु, ही बाब घातक आहे. समाजातील प्रतिष्ठा जपण्याच्या दडपणाखाली अत्याचार सहन केले जातात.

कशी घ्‍यावी काळजी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....